Ahmednagar : Corona Updates : जिल्ह्यात आणखी ०६ रुग्ण वाढले

*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३०७*
*बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४*
*जिल्ह्यातील १९३ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह*
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आन ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्जेपूरा भागातील ०३, पाइपलाईन रोड ०१, नगर ग्रामीण मध्ये विळद ०१ आणि पाथर्डी येथील एक रुग्ण आढळून आला. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३०७ इतकी झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ९६३ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना  टेस्ट लॅब मध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या २३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत  शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालनुसार बाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये नगर शहरातील २५, नेवासा येथील आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला होता.
 दरम्यान, आज १९३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: ३०७*
*बरे झालेले रुग्ण: ६३४*
*मृत्यू: २२*
*एकूण रुग्ण संख्या: ९६३*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here