Ahmednagar : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह; १५ रुग्णांची कोरोनावर मात

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी झाली आहे.
आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील ०१, श्रीगोंदा येथील झेंडा चौक येथील ०५ तसेच श्रीगोंदा शहरातील एक आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण बाधित आढळून आले. नगर शहरात गवळी वाडा येथील ०९, चितळे रोड ०१, झेंडी गेट ०१, आणि शहराच्या मध्यवस्तीत ०४ जण बाधित आढळून आले आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: ३१५*
*बरे झालेले रुग्ण: ६४९*
*मृत्यू: २२*
*एकूण रुग्ण संख्या: ९८६*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here