Beed Corona Updates : जिल्ह्यात काल 9 रुग्ण पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड जिल्ह्यात काल रविवारी 195 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 9 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बीडकरांची चिंता वाढली आहे. तर 184 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहे. तसेच दोघांचे अहवाल अनिर्णित आहेत. 

वाचा सविस्तर अहवाल – जाहिराती नंतर

प्रशासन वारंवार जनतेला आवाहन करत असून कोणीही घराच्या बाहेर पडू नये. तरीसुद्धा जनतेला स्वतःची काळजी नाही व कोरूना रुग्णाच्या संपर्कात येत असताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये परळी शहर लॉकडाऊन असून शहरातील काही भागात संचारबंदी लागू केलेली आहे. काही भाग संचारबंदी स्थितीत गेले आहे, असे असतानाही शहरामध्ये रुग्णाचा प्रसार दिवसेंदिवस होत असताना दिसत आहे. तरी जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here