Kopargaon : कत्तलीसाठी गोवंश बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव शहरात काल अवैधपणे कत्तलीसाठी गोवंश बाळगल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी गणेश जगन सदाराम (वय-३९) वर्ष रा जोतवाड ता सिंदखेडा जि धुऴे व पवन ठाकरे रा तऴेगाव ता. संगमनेर यांचे विरुद्ध फिर्यादी अमित अशोक जैन (वय-३९) रा.कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगावात काल रविवारी दि.१२ जुलै रोजी रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास अवैध रित्या १२ हजार रुपये किं.ची एक पांढऱ्या रंगाचा १५ वर्ष वयाचा बैल,जाड व लांब शिंगे असेलला तसेच ५ फुट लांब व ३.५ फुट उंची असलेला व लांब शेपुट असलेला,१० हजार रु. किं.ची एक लालसर रंगाचा १२ वर्ष वयाचा बैल,जाड व लांब शिंगे असेलला तसेच ५ फुट लांब व ३.५ फुट उंची असलेला व लांब शेपुट असलेला त्याचे पृष्ट भागावर जख्म झालेली ८ हजार रु. किं.ची एक काळपट रंगाचा ८ वर्ष वयाचा बैल,जाड व लांब शिंगे असेलला तसेच ४ फुट लांब व ३ फुट उंची असलेला व लांब शेपुट असलेला २० हजार रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची पिक अप व्हँन क्र.एम.एच.४१ ए.यु. ०४५२ जु.वा.किं.२ लाख ३० हजार रु.एकुण किंमत असलेले पशुधन जप्त करण्यात आले आहे.

कोरोना विषाणु ( कोवीड-१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये निर्गमीत केलेल्या आदेशाचे तसेच संचारबंदीे आदेशाचे उल्लघंन करुन स्वाताचे फायद्यासाठी गोवंश भाकड जनावरे यांना क्रुरपणे वागणूक देऊन कत्तलीच्या उद्देशाने स्वताजवऴ बेकायदेशीर जवळ बाळगून वाहतूक करताना मिळून आला म्हणून त्याचे विरुद्ध कारवाई केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी विरुद्ध गु.र.नं.कलम २५७/२०२०भा.द.वि. ४२९, १८८(२),२६९,२७१,३४ प्रमाणे व भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधि.१९६० चे कलम ११(१)(ह) व महा.प्राणी संरक्षण कायंदा व सुधारणा अधि.क.१९९५ चे कलम ५(ब) ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

काय आहे गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा

सन-१९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले.१९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.पुढे राज्यात सत्ताबदल झाला.केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला.परंतु २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला. अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली. १९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.

या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला. म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली.हा कायदा एवढय़ावरच थांबत नाही तर आणखी काही कडक व कठोर र्निबध लादले आहेत.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही.त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही. बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.म्हणजे एक प्रकारे गाय,बैल,वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे.यापैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here