Ahmednagar : मनपातील चौघांना कोरोना; प्रशासकीय कामकाज थांबले

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर : शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. गेल्या 13 दिवसांपासून नगर शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचा आलेख चढता राहिला आहे. भिंगार शहरात देखील कोरोनाचा आलेख वेगाने चढला आहे. शहराचे प्रशासकीय व्यवस्थापन करणाऱ्या महापालिकेत देखील कोरोना संसर्ग झाला आहे. एका अधिकारी व तीन कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झालाा आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाने ग्रासले असल्याने महापालिका कामगार संघटनेने या इमारतीत काम करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेतील कामकाज आज सकाळपासून ठप्प आहे.
महापालिका कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले, “नवीन प्रशासकीय इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या इमारतीत महापालिका कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दुसऱ्या एखाद्या इमारतीत या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी. तसेच महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवावीत. यात सॅनिटायझर, मास्क, हातमोजे आदींचा समावेश असावा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here