AhmednagarBreaking : भिस्तबागमध्ये 16 रुग्ण; प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नगर : भिस्तबाग परिसरात कोरोनाचे 16 रुग्ण आढळून आल्याने आज दुपारी हा परिसर सील करण्यात आला. 26 जुलैपर्यंत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

भिस्तबागसह आयोद्धानगर, काैशल घर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, सेंदूरकर घर, पिंपळकर, मचे घर ते काैशल हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. याबरोबरच बफर झोनमध्ये काैशल्यनगरी, शेजारील गजानन काॅलनी, संगीत नगर, दक्षिणेकडील सिमला काॅलनी, दत्तमंदिरपरिसर, विवेकानंद काॅलनी, विठ्ठल मंदिर परिसर, आशियाना काॅलनी, साईबन काॅलनी, किसनगिरीबाबा नगर आदी परिसराचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here