Beed : लोखंडी जिन्यात विजेचा प्रवाह उतरल्याने शॉक बसून सात वर्षीय चिमुकलीसह वडील व चुलत्याचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

घरातील लोखंडी जिन्यात विजेचा प्रवाह उतरल्याने शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीसह वडील व चुलत्याचा मृत्यू झाला.  ही घटना बीड शहरातील गोविंद नगर भागात आज (दि.13) सकाळी घडली.

श्रेया तुळशीराम वडमारे (वय7), तुळशीराम वडमारे, रमेश वडमारे (वय 45), अशी मयतांची नावे आहेत.

आहे अधिक माहिती अशी की बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील गोविंदनगर येथे एसटी महामंडळात वाहक असलेले तुळशीराम वडमारे व त्यांचे बंधू रमेश वडमारे राहतात. यांच्या घराला लोखंडी शिडीचा वापर केला जातो. गेल्या दोन दिवस झालेल्या सतत पावसाने जिन्याजवळ असलेल्या विजेच्या तारेचा प्रवाह जिन्यात उतरला.

आज सकाळी तुळशीराम यांची सात वर्षाची मुलगी श्रेया हिला सुरुवातीला शॉक बसून ती जिन्याला चिकटलेली दिसली. तिला वाचवण्यासाठी तिचे वडील तुळशीराम प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांनाही शॉक बसला. त्याच वेळेस त्यांचे बंधू रमेश वाघमारे तेथे आले असता ते दोघेही शिडीला चिकटलेले पाहून त्यांना वाचवण्यास रमेश वाघमारे गेले असता त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

यामुळे गोविंद नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुळशीराम वडमारे हे बीड येथे एसटी मंडळात वाहक आहेत. त्यांचे बंधू रमेश वडमारे हे रिक्षा चालवतात. हे संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असून आज सकाळी काळाने त्यांच्यावर झडप घातली. संपूर्ण बीड शहरात या घटनेने एकच खळबळ माजली संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here