Karjat : संत सदगुरु गोदड महाराज रथोत्सवावर चित्रित लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण

फोटो ओळी - संत सदगुरु गोदड महाराज रथोत्सवावर चित्रित लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करताना अधिकारी, पदाधिकारी आणि छायाचित्रण टीम छाया : डॉ अफरोजखान पठाण, कर्जत

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

कर्जत : श्री संत सदगुरु गोदड महाराज रथोत्सवावर चित्रित लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण सोमवारी कर्जत येथील गोदड महाराज ध्यानमंदिर येथे करण्यात आले.

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे १५० वर्षाची श्री संत सदगुरु गोदड महाराजांच्या रथोत्सवाची परंपरा यावर्षी खंडित होणार असल्याने रथोत्सवाच्या आठवणी जाग्या व्हाव्यात आणि या काळातही लोकांना रथोत्सव आपल्या घरी जनता कर्फ्यूमध्ये पाहता यावा म्हणून प्रगती नर्सरी प्रस्तुत रथोत्सव व्हिडीओग्राफी टीम व प्रोमोमॅक्स ऍडव्हटायजिंग निर्मित आठवणीतला रथोत्सव हा लघुपट तयार केला आहे.
या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण श्री.गोदड महाराज ध्यान मंदिर कर्जत येथे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, मा.जि. प. सदस्य प्रवीण दादा घुले पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे, सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा.तानाजी पाटील, प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे, महेश तनपुरे, नगरसेवक सचिन घुले, ओंकार तोटे, भास्कर भैलूमे, युवराज काका लाळगे व सर्व पत्रकार बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करत रथोत्सव काळात १५,१६ व १७ जुलै रोजी नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करीत घरी राहून लघुपट पाहण्याचे आवाहन करत या काळात प्रशासनास सहकार्य करण्यास सांगितले. माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले पाटील यांनी सर्व फोटोग्राफी टीमने केलेल्या कामाचे कौतुक करत धन्यवाद दिले.

यावेळी प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे, विनायक ढवळे,  अस्लम पठाण,  अण्णा बागल, भरत तुपे, योगेश गांगर्डे, विशाल ढवळे, सागर डाळिंबे, सुमित भैलूमे, अर्षद शेख, मंगेश ढवळे, गणेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कर्जतचे ग्रामदैवत श्री.संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव प्रसासनाच्या आवाहनानंतर रद्द करण्यात आला.या काळात भविकांना घर बसल्या रथोत्सव लघुपटाच्या माध्यमातून अनुभवता यावा म्हणून कर्जत येथील व्हिडिओग्राफी टीम यांनी संकल्पना मांडली आहे यात आपण भाग घेऊन या स्तुत्य उपक्रमात भाग घेतला आहे.
-शरद तनपुरे,संचालक प्रगती नर्सरी,कर्जत 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here