Jalna : संचारबंदीत स्कुटीवरून विदेशी दारूची वाहतूक; 57,000 चा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – नवीन मोंढयाकडून कन्हैयानगरकडे जाणाऱ्या पुलाजवळ चंदनझिरा पोलिसांनी सापळा लावून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या स्कुटीस्वारास शिताफीने पकडले. यावेळी स्कुटीवर साडीमध्ये गुंडाळलेल्या कपड्यात विदेशी दारूचा साठा आढळून आला.

यावेळी 12 हजाराची मॅक्डोल नंबर-1 आणि 45 हजाराची स्कुटी असा 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश बंडू मेंगडे (वय 20, रा. संभाजीनगर, जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी रमेश चव्हाण, अनिल काळे, भरत कडूळे, चंदू माळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here