Sangamner : कोरोनाचा ‘चौदावा’ बळी..!

0

कासारवाडीत रुग्णाचा अखेर आज मृत्यू

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर तालुक्यात कोरोना विषाणूंनी धुडगूस  घातला असून आज पहाटे शहर जवळील कासारवाडीतील एका 63 वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान  जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोनामुळे आजचा हा 14 वा बळी गेला आहे. तर तालुक्याची कोरोना बाधित रुग्ण संख्या ही 232 वर जाऊन पोहचली आहे. ही संख्या नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त संख्या झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता संगमनेरकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरा जवळील कासारवाडीत या  रुग्णाच्या रुपाने 3 जुलैला प्रवेश केला होता. या व्यक्तिचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी जिल्हा रुग्णालयाने पुन्हा या रुग्णाचा स्त्राव घेतला असता रात्री उशिराने तो पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर बनत चालली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर तालुक्यात कल रात्री 10 जण कोरोना बाधित रुग्ण सापडल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे संगमनेरकर मात्र हादरले आहेत. संगमनेर तालुक्यात कोरोनाचे संकट वाढतच असून संपूर्ण तालुका हादरला आहे. काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे 51 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, जनता नगर येथे 24 वर्षीय तरुण, रहमतनगर 38 पुरुष, अरगडे गल्ली येथे 41 वर्षीय पुरुष, विद्या नगर येथील 66 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर येथील 63 वर्षीय महिला भारत नगर येथील 40 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील निमोण येथील 56 वर्षीय पुरुष व कौठे धांदरफळ येथील 35 वर्षीय पुरुष, असे एकूण 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 232 झाली आहे. सध्या 80 जणांवर उपचार सुरू असून संगमनेर मध्ये आत्तापर्यंत 14 जणांचे मृत्यू झाले आहेत. या वाढत्या संकटाने संगमनेरकर मात्र आता हादरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here