Akole : देवठाण येथे कोविड सेंटर, आजपासून स्वॅब घेण्यास सुरुवात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अकोले तालुक्यातील देवठाण येथील क्वारंटाईन सेंटरला कोविड सेंटर करण्यात आले असून आजपासून येथे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. आज दिवसभरात २१ संशयितांचे स्वॅब घेण्यात येऊन ते तपासणीसाठी अहमदनगर येथील शासकीय लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.

अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रार्दुभाव हळूहळू वाढत आहे. ग्रामीण भागासह अकोले शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. प्रशासनही सतर्क असल्याने तात्काळ कन्टेन्मेंट झोन, बफर झोन करण्याचे काम करत आहे.

प्रशासनाने भविष्यातील अडचणीचा विचार करता अकोले तालुक्यातील रूग्णांना अहमदनगर अथवा संगमनेरला जाणे व तेथे येणाऱ्या अडचणी टाळाव्या यासाठी तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा. इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे, डॅा.बाळासाहेब मेहेञे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातच रुग्णांचे स्वॅब घेऊन ते अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
हे कोविड सेंटर तालुक्यातील खानापूर येथील क्वारंटाईन सेंटर म्हणून सुरु केलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहात करण्यात आले आहे. काल शहरातील कारखाना रोडला हासे कॅाम्प्लेक्समध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील २१ जणांचे स्वॅब आज या कोविड सेंटेमध्ये घेऊन ते अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तालुक्यात कोविड सेंटर सुरु केल्याने अकोले करांना याचा लाभ होणार असून लक्षणे असणाऱ्यांनी शासकीय रूग्णालयातील डॅाक्टरांना दाखवून स्वॅब तपासून घेण्यासाठी पुढे यावे, असे अवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here