Newasa : दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ला चौकशीच्या मागणीसाठी शुक्रवारी तहसिल कार्यालयावर मोर्चा

3
रिपाई नेते अशोक गायकवाड यांची सीआयडी चौकशीची मागणी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नेवासा तालूक्यातील गिडेगांव येथील दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची सखोल चौकशी करुन खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावण्याच्या मागणीसाठी शुक्रवार (दि.१७) रोजी दुपारी बारा वाजता नेवासा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, अशी माहिती युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात रिपाई नेते गायकवाड यांनी म्हटले आहे की, गिडेगांव येथील दलित अल्पवयीन मुलीच्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासाबाबत पोलिसांना अपयश आल्याने पीडित मुलीला योग्य न्याय मिळालेला नसून या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, अशी मागणी यावेळी निवेदनात केली आहे.

कोरोना संसर्ग रोगाची काळजी घेण्यासाठी शासनाच्या आदेशाच्या पालन करुन सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन दलित अल्पवयीन मुलीच्या न्यायहक्कासाठी आंबेडकरी चळवळीतील भिम सैनिक मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे यावेळी अशोक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी रिपाईचे तालूकाध्यक्ष सुशिल धायजे, घटनापती युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक रवी भालेराव, इंदिरा कॉंग्रेस (एस.सी) विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण साळवे, राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here