Shrirampur : तात्काळ निदान तपासणी शिबिरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट; ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही या ठिकाणीच तात्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड क्र. ७ मध्ये सोशल क्लबच्या सभागृहात तत्काळ तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात सहा आरोग्य कर्मचारी व दहा आशा सेविकांनी शिबिराला उपस्थित असलेल्या व्यक्तींची तपासणी केली. यावेळी नॉद्रर्न ब्रॅच ते सरस्वती कॉलनीपर्यंतच्या व्यक्तींनी हजेरी लावली. यातील ७८ व्यक्तींची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यांच्यावर येथील संत लूक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहते.
या शिबिरासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर पार पडल्यानंतर याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना देण्यात आली. त्यांनी आणखी रॅपिड टेस्टिंगसाठी आणखी किट पाठविण्याची ग्वाही दिली आहे, अशाप्रकारे शहरातील इतर भागातही शिबिरे आयोजित केली जाणार आहे. त्यास नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे. त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तात्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here