सुशांत सिंह राजपूतच्या गर्लफ्रेंडने केली भावनिक पोस्ट

आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन!

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला असून   त्याची मैत्रिण आणि कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतशी निगडीत भावनिक पोस्ट केली आहे.

राष्ट्र सह्याद्री

प्रतिनिधी मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ माजली आहे.सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. आता रियाने आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला आहे. रियाने सुशांतसोबतचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.या दरम्यान रियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीच पोस्ट केलं नव्हतं. परंतु, व्हॉट्सॅपवर तिने सुशांत सोबत आपला डिस्प्ले फोटो ठेवला आहे. रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  तूच तो व्यक्ती आहेस, ज्याने मला प्रेमात विश्वास दिला .आणि प्रेमाची जाणिव करून दिलीस.तूच मला शिकवलसं की, कसं एखादं सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकतं. मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक दिवस शिकली आहे. मला माहिती आहे की, तू सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. चंद्र, तारे, गॅलेक्सी या सर्वांनी मोकळ्या मनाने एका भौतिकशात्र तज्ज्ञाचं स्वागत केलं असणार. तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार, आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावं. तू एक उत्तम व्यक्तीमत्त्व असणारा व्यक्ती होतास, ज्याला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे .आणि तू सुद्धा हेच सांगायचास की, आपलं प्रेम वेगळं आहे. तू सारं काही मोकळ्या मनाने करू शकतेस. आणि आता तू हेसुद्धा दाखवून दिलसं की, आपलं प्रेम एक इतरांसाठी उदाहरण आहे. तुला शांती मिळो सुशी, तुला गमावून आज 30 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.’

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here