ना धाक ना धोका कोरोना साधतोय मोका

3

बीड जिल्हा 222 वर; मृत्यू संख्या 11

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिरूरकासार : जिल्ह्यात कोरोनाने आता कहर सुरु केला असुन त्याला सर्वस्वी बे-जबाबदार म्हटले तर जिल्हावासीच आहेत. सोशल डिस्टंस कुठेही पाळला जात नसल्याने जिल्ह्याचा आकडा वाढत चालला असला तरी कोणालाच धाक राहिला नाही. त्यामुळे धोका वाढल्याने कोरोना मोका साधुन पाय पसरत आहे. महिनाभरात आकडा 222 वर गेला तो झपाट्याने दररोज वाढत आहे. 11 जणांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील जनतेनी आख्खा उन्हाळा कोरोनाच्या धाकात काढला प्रशासनाने हि कामगिरी चांगल्याप्रकारे हातळल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार या सह आरोग्य विभाग यांचे कौतुक झाले परंतु गेली महिनाभरापासून सरकारने शिथिलता दिल्याने शोशलडिस्टींग चा पारच फज्जा उडाला याचा परिणाम वाईट होऊ लागला असल्याने कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. स्पेन, इटली अशा बेजबाबदार मुळे व्हायला वेळ लागणार नाही.
जिल्हा प्रशासन घसा कोरडा होईपर्यंत सांगत असल तरी जनतेला काहीच वाटत नाही याचे वाईट वाटते. बेजबाबदार पणा सोडून आपल्या सह कुटुंब, शेजारी, गाव, तालुका, जिल्ह्याची काळजी घेऊन नियम पाळले तर कोरोना मोका साधुन पाय पसरणार नाही. नाही तर तुम्हींही फोटोत दिसाल अन् दुसर्‍यालाही दिसण्यास भाग पाग पाडाला याची जाणीव ठेवणे काळाची गरज बनली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here