अल्प पेन्शनधारकांना पिवळे रेशनकार्ड

3

महसूल मंत्र्याकडून सूचना

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिरसगाव : इपीएस 95 पेन्शनधारकांना सध्या 1000/-ते 2000/- अशी अल्प पेन्शन दरमहा मिळत असल्याने आर्थिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. पेन्शनवाढ मिळावी म्हणून अनेक आंदोलने चालू आहेत केंद्र सरकारकडे पाठपुरावा राष्ट्रीय संघर्ष समिती करीत आहे.
अद्याप कोणताही निर्णय नसल्याने व कोरोना महामारी संकट आल्याने लॉकडाऊनमुळे आणखी संकट उद्भवल्याने राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनर्स शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना भेटले व समस्या सांगून या काळात अल्प पेन्शनधारकांना पिवळे रेशनकार्ड मिळावे म्हणून मागणी केली ती त्यांनी मान्य करून तशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना दिल्या आहेत. ही संघटना बँक, साखर कारखाने, सहकारी संस्था, सोसायट्या, वीज पणन, शेती महामंडळ, हॉस्पिटल, साई, संस्थान आदी सर्व संस्थांचे सेवानिवृत्तासाठी राज्यभर, प्रतिनिधित्व करीत आहे. त्याप्रमाणे पेन्शनधारकांना पिवळे रेशनकार्ड देणेबाबत संबंधिताना आदेश व्हावेत असे ना. बाळासाहेब थोरात यांनी पत्राने कळविले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here