मक्तापूर येथे रस्त्याच्या तक्रारीनंतर ठेकेदाराकडून डागडुजी सुरू

0

रस्त्याची चौकशी करा; गणेश झगरेंची मागणी
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नेवासा : महिन्याभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथील नित्कृष्ठ दर्जाच्या रस्त्याच्या तक्रारीनंतर संबधित ठेकेदाराकडून डागडुजी सुरू करण्यात आली असून या रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शाखा प्रमुख गणेश झगरे यांनी केली आहे.
नेवासाफाटा ते मक्तापुर गावापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास मंजुरी आल्यानंतर हे काम महिन्याभरापूर्वीच रोजगार हमी योजनेच्या कामा अंतर्गत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र नुकत्याच पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी खड्डे पडले असल्याने शिवसेना शाखा प्रमुख गणेश झगरे यांनी या रस्त्याची तक्रार ग्रामस्थांना बरोबर घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली व रस्ता दर्जेदार करा अशी मागणी करून आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून संबधित ठेकेदाराने खड्डे बुजविण्यासाठी डागडुजी सुरू केली असल्याचा आरोप गणेश झगरे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे यावरून सदरच्या डांबरीकरण रस्त्याचे काम किती नित्कृष्ट दर्जाचे झाले हे सिद्ध झाले आहे असे गणेश झगरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
सद्या रस्त्याच्या डागडुजीचे काम ठेकेदारामार्फत केले जात असून ते देखील नित्कृष्ट दर्जाचे होत असून डागडुजीचे काम करून ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ही गणेश झगरे यांनी केला असून या संदर्भात वरीष्ठ पातळीवरुन या कामाची खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख गणेश झगरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here