शिवाजी महाराजांवरील वक्तव्य प्रकरण : कॉमेडिअन अग्रिमाची माफी

वृत्तसंस्था । राष्ट्र सह्याद्री

अग्रिमाने शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आक्षेप अनेकांनी ट्विटरवरून घेतला होता. हा व्हिडिओ ज्या स्टुडिओत शूट झाला, तिथे जाऊन मनसेने तोडफोडही केली. यानंतर अग्रिमा जोशुआने याबद्दल शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्या एका अॅक्टमधली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात ती अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी बोलताना दिसते. यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी उमटली. या व्हीडिओमध्ये अग्रिमाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असा आक्षेप अनेकांनी घेतला. अनेकांनी ही नाराजी ट्विटरवर व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि त्यांची थट्टा सहन केली जाणार नाही असा सूर सोशल मीडियावर उमटल्यानंतर ट्विटरवर याविषयीचा हॅशटॅगही ट्रेंड व्हायला लागला. अग्रिमाचा हा व्हिडिओ ज्या स्टुडिओत शूट करण्यात आला होता, तिथे जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवर याचा व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आलेला आहे. अग्रिमाने आपल्या ट्रोलिंगबद्दल ट्वीट केलं होतं. भाजपच्या आयटी सेलने आपल्यावर ट्रोल आर्मी सोडली असल्याचं म्हणत तिने या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंना टॅग केलं होतं.

यानंतर शुक्रवारी (10जुलै) रात्री ट्वीट करत तिने शिवप्रेमींची माफी मागितली. अग्रिमाने ट्वीटमध्ये म्हटलंय, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते. मी या महान नेत्याचा खरंच आदर करते. त्यांच्या समर्थकांची मी मनापासून माफी मागते. हा व्हिडिओ आधीच काढून टाकण्यात आलेला आहे, याची कृपया दखल घ्यावी.”

अग्रिमा जोशुआच्या स्टँडअप कॉमेडीचा संपूर्ण व्हिडिओ आता उपलब्ध नाही, पण अनेकांनी यातल्या वादग्रस्त ठरलेल्या भागाची क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. कोरा या वेबसाईटवर आपण शिवस्मारकाविषयी माहिती वाचत असताना तिथे काय काय लिहीलं होतं याविषयी ती बोलताना दिसते. ‘हा व्हिडिओ 2019 मधला आहे, तिने टोमणा मोदी आणि पुतळाप्रेमाबद्दल मारलाय’ असं पत्रकार राजू परुळेकर यांनी याविषयी ट्वीट करत म्हटलंय.

3 COMMENTS

  1. Nice post. I learn something more difficult on completely different blogs everyday. It’s going to at all times be stimulating to learn content from other writers and practice somewhat one thing from their store. I’d want to use some with the content on my blog whether or not you don’t mind. Natually I’ll provide you with a hyperlink in your internet blog. Thanks for sharing.

  2. Hi, Neat post. There is a problem along with your site in web explorer, may test thisK IE still is the marketplace chief and a huge element of folks will miss your excellent writing because of this problem.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here