सारा अली खानच्या चालकाला कोरोनाची लागण

4

राष्ट्र सह्याद्री

मुंबई : बच्चन कुटुंबियांपाठोपाठ आता कोरोनाने बॉलिवूडमधील इतर कलाकारांच्या घरात शिरकाव केला आहे. अभिनेत्री सारा खानच्या चालकाला कोरोनाची लागण झाली आहे.साराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिन्हे लिहिलं आहे की,’माझ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. तात्काळ आम्ही ही माहिती बीएमसीला दिली आहे. त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबियांची आणि इतर कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. माझी मदत केल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार.’असे  साराने पोस्टमध्ये लिहले आहे .

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here