दुचाकी धडकेत महिला जखमी 

राष्ट्र सह्याद्री
 श्रीरामपूर प्रतिनिधी: श्रीरामपूर – बेलापूर रस्त्यावर रामगड येथे रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेला पायी चालत असताना गयाबाई गणपत बेल्हेकर रा.रामगड बेलापूर यांना भरघाव वेगातील दुचाकी नंबर एम एच 17 सीजे 2625 हिच्यावरील चालकाने ररत्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक देवून उडविले या अपघातात गयाबाई बेल्हेकर वय 77 या वृध्द महिला गंभीर जखमी झाली आरोपी खबर न देताच फरार झाला. या प्रकरणी सागर लक्ष्मण बेल्हेकर रा.रामगड धंदा ड्रायव्हर या तरुणाने श्रीरामपूर पोलिस शहर ठाण्यात फिर्याद दिल्यावरून दुचाकी चालक राजन लक्ष्मण जगधने रा.उक्कलगाव यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम 279, 337, 338, मोटार वाहन कायदा 184,134 (अ)(ब) 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here