Shrirampur : मका खरेदी केंद्र ‘मुदतीपूर्वीच’ बंद! शेतकर्‍यांच्या अडचणीत भर 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – बेलापूर येथे जून महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या मका हमी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अवघ्या 60 हून अधिकच शेतकर्‍यांची मका खरेदी झाली. त्यातच 218 पैकीच 100 हून अधिकच शेतकर्‍यांची मका खरेदीच्या प्रतीक्षेत असतानाच 15 जुलै आधीच मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळेच मुदत संपल्याआधीच मका खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. याच कालावधीत कोरोना प्रादुर्भावमुळे बेलापूरगाव लाॅकडाऊन असतानाच चार ते पाच दिवस मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. त्यामुळे नोंदणीकृत शेतकर्‍यांची मका खरेदी करण्यास विलंब झाला असल्याचे सांगण्यात आले.
अचानकच 14 जुलै रोजी मका खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याकडे धाव घेतली. दीड महिन्यापूर्वीच शेतकर्‍यांनी मका खरेदीची नोंदणी केली असतानाच प्रकाश चित्ते यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मका खरेदीची नोंदणीकृत शेतकर्‍यांची तक्रार कृषी मंत्र्यांकडे केली होती. कृषी मंत्री भुसे यांची बैठक सुरू असल्याची सांगण्यात आले. ते बैठकीनंतर भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याशी याबाबतच चर्चा करणार असल्याची माहिती, शेतकर्‍यांनी ‘राष्ट्र’ सह्याद्रीशी बोलतांना दिली.

व्यापारी मका खरेदी एक हजार ते चौदाशे रूपये क्किंटल दरामध्येच खरेदी केली जात आहे. किमान दराप्रमाणेच ती पाचशे रूपयांनी कमी मिळत आहेत. शासकीय हमीभाव केंद्रामुळे एक सातशे पन्नास रूपये भाव सध्या सुरू आहे. बेलापूर केद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदी केली जात 100 हून अधिकच शेतकर्‍यांची मका खरेदी करणे बाकी असतानाच ‘त्यातच’ सोमवारीच संध्याकाळीच खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती शेतकर्‍यांनी सांगितली.
खरेदी करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना अद्याप पैसेही मिळालेले नसल्याचे सांगितले जात आहे. मका खरेदी केंद्राची मुदत संपल्या आधीच बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याबाबतीच शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले असता, मका खरेदी केंद्राची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. यातच लाॅकडाऊन काळात बेलापूर मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. त्यातच मका नोंदणीकृत खरेदीचा साठा पूर्ण झाला असल्याने त्यातच मका ठेवण्यासाठी ‘उपलब्धता’ जागा नसल्याने असे प्रशासनाकडून शेतकर्‍यांना सांगितले जात आहे. भाजपचे प्रकाश चित्ते, प्रकाश थोरात, नानासाहेब थोरात,आदिसह शेतकर्‍यांनी तहसीलदार पाटील यांची भेट घेत चर्चा केली याबाबतही प्रशासनाने तातडीनं निर्णय घ्यावा असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here