Kopargaon : मुखपट्टी न बांधता फिरणा-या चौघांवर गुन्हा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव शहरांतील धारणगाव रस्त्यावर माधव बागेच्याजवळ काल (मंगळवार) रात्री  ७.४२ वाजेच्या सुमारास कोपरंगाव शहर पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी श्रीकांत मच्छीन्द्र लकारे (वय-२४) रा.कहार गल्ली, अक्षय संतोष जाधव (वय-२२), विकी नारायण पंडोरे (वय-२२),विनोद सुनील इमाले (वय-२१) सर्व रा.कहार गल्ली यांनी शहरात कोरोना साथ चालू असल्याची माहिती असतानाही आपल्या तोंडाला मुखपट्टी न बांधता आपल्या दुचाकी (क्रं.एम.एच.१७ बी.यू.६६४८) हिच्यावर दाटीवाटीने फिरताना आढळून आले. याप्रकरणी या चौघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते. त्यावर उपचार सुरु होते. ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला, वैजापूर, सिन्नर, नाशिक, नगर, औरंगाबाद, संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात सुरेगाव व करंजी येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत. त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.

मात्र, जेंव्हा अशा नाठाळ नागरिकांना प्रशासनाची संकेतांची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिसांना आपल्या दंड्याचे काम नाईलाजाने सुरु करावे लागते. तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे. त्यामुळे पोलिसांनी काल सायंकाळच्या सुमारास ७.४२ वाजेच्या सुमारास असेच बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी श्रीकांत मच्छीन्द्र लकारे (वय-२४) रा.कहार गल्ली,अक्षय संतोष जाधव (वय-२२),व विकी नारायण पंडोरे (वय-२२),विनोद सुनील इमाले (वय-२१) सर्व रा.कहार गल्ली हे सर्व आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवर कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मोकटपणे फिरताना आढळून आले आहे.

त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२५८/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१,३४ प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम १२८/१७७ प्रमाणे कोरोना विषाणु(कोवीड-१९) प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा-१८९७ अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लघन करुन विनापरवाना तोंडाला मुखपट्टी न बांधता कोपरगाव शहरात फिरतांना मिळून आले, अशा मजकुराचा गुन्हा फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-३२) यांनी दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मांनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here