Shrigonda : बाजार समितीचे उपसभापती पाचपुते यांच्या विरोधात अविश्वास ठराव, 12 संचालकांच्या सह्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोईटे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला  होता. ज्यावेळी ते सभापती झाले आणि लगेच त्यांच्या सह्यांचे अधिकार काढले होते. सह्यांचे अधिकार उपसभापती वैभव पाचपुते यांच्याकडे होते. मात्र, आता अठरापैकी बारा संचालकांनी उपसभापती यांच्या विरोधात मनमानी आणि इतर संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे कारण देत जिल्हाधिकारी यांच्याकडे संचालक संजयराव जामदार यांच्या नेतृत्वाखालीअविश्वास  ठराव दाखल केला.

२४/१०/२०१६ रोजी श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती.  निवडणुकीत जगताप ,नाागवडे  गटाचे   दहा संचालक निवडून आले तर भाजपच्या आमदार बबनराव पाचपुते गटाचे आठ संचालक निवडून आले। काही दिवसात  सभापती धनसिंग भोईटे यांचे सह्यांसह सर्व अधिकार काढून घेत नाममात्र सभापती ठेवले होते.  . उपसभापती वैभव पाचपुते यांनी सगळा कारभार हातात घेतला .

आता बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक संजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १४ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.यावर बारा संचालकांच्या सह्या असून पाचपुते हे मनमानी पद्धतीने काम करत असून संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे त्यात म्हंटले आहे.
लिंबू व्यापाऱ्यांचा मिटला संप, आता होणार लिंबाचे लिलाव 
तालुक्यात लिंबू खरेदी वरून राजकारण करून शेतकरी आणि लिंबू व्यापारी यांच्या मध्ये  संघटनेने असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता .मात्र नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर,नुकताच  सभापती पदाचा राजीनामा दिलेले   धनसिंगपाटील , बाळासाहेब नाहटा , संजय आबा जामदार , विट्ठलराव पाचपुते ,  संजय महानडुळे,  भास्करराव वागस्कर,  लहानू धायगुडे, मीनाताई आढाव, उर्मिलाताई गिरमकर , शैलाताई काटे ,सतिष पोखरणा, उमेश पोटे या सर्व संचालक व शेतकरी प्रतिनिधीची बैठक झाली यात शेतकरी बंधूंचे नुकसान व होणारी गैरसोय लक्ष्यात घेऊन लिंबू लिलाव पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे उमेश पोटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here