Beed : शहरात कंटेन्मेंट झोननुसार भाजी विक्रीसाठी परवानगी

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड – शहरात विविध भागात कोरोना विषाणुची लागण झालेले रूग्ण आढळूण आलेले असल्याने प्रतिबंधात्मक व्यवस्था अंतर्गत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आलेले आहेत. ज्या भागामध्ये कंन्टेन्मेंट झोन लागू करण्यात आलेले आहेत त्या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा उपाययोजना केल्या जात आहेत.
यामध्ये भाजीपाला पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार विविध कन्टेन्टमेन्ट झोननुसार त्या भागात हातगाडयांव्दारे फेरी करून भाजी विक्री करणेसाठी परवानगी देण्यात आली आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये नियुक्त सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी या भागातील नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी दिले आहेत. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षक आणि भाजी विक्रेत्यांचे प्रभाग निहाय नावे व संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here