प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

संगमनेरकरांना आज कोरोनाने जोरदार धक्का दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने आज तर विक्रमच केला. आज दिवस भरात एकूण 31 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात दोन रुग्ण हे दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे संगमनेरकर अक्षर: घाबरून गेले आहेत तर प्रशासन ही आता काळजीत पडले आहे.
तालुक्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांत आजची संख्या सर्वात मोठी आहे. आजच्या दिवसभरात तब्बल 31 नव्या रुग्णांची भर पडल्याने संगमनेरातील बाधितांची संख्या 266 झाली आहे.
आज सकाळी सुरुवातीला दोघांचे व नंतर पाच महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली होती. आतातरी दिवसभर दुसरी अप्रिय घटना घटणार नाही असे वाटत असतांना कोरोनाने पुन्हा जोराचा धक्का दिला सायंकाळ सुमारास तब्बल चोवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील दोघांचे अहवाल सलग दुसर्यांदा पॉझिटिव्ह आल्याने आत्ताच्या संख्येत चोवीस नव्या रुग्णांची भर पडली आहे.
आज सकाळी घुलेवाडी येथील 65 वर्षीय व तळेगाव दिघे येथील 42 वर्षीय व्यक्ती, तर या अहवालानंतर अवघ्या काही वेळात नगरच्या शासकीय प्रयोगशाळेचा अहवालही येवून धडकला. या अहवालातून तालुक्यातील आणखी पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यात निमोणमधील 53 व 45 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 30 व 19 वर्षीय महिला व गुंजाळवाडी येथील 59 वर्षीय महिला अशा पाचही महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असे एकूण सात जणांचे अहवाल आज सकाळी प्रशासनास प्राप्त झाले होते तर सायंकाळी जोरदार धक्का देत एकाच वेळी 24 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले हा संगमनेर सह जिल्ह्यालाच मोठा धक्का बसला आहे.
आजच्या सायंकाळच्या आलेल्या अहवालानुसार शहरातील नवघर गल्ली परिसरातील 55 वर्षीय महिला, गणेशनगर परिसरातील 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला, भारतनगर परिसरातील 39 वर्षीय व्यक्ती, मालदाड रोड परिसरातील 45 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, मेनरोडवरील 43 व 19 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, एकता चौक परिसरातील 43 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 21 वर्षीय तरुण. तर तालुक्यातील निमोण येथून सहा वर्षीय बालक, माहुली येथील 56, सात, पाच, बारा वर्षीय महिला, 30, 28, 35 व सात वर्षीय पुरुष, साकुर (चास, अकोले) येथील 65 वर्षीय वृद्ध, तळेगावमधून 40 वर्षीय व्यक्ती व 24 वर्षीय महिला, गोल्डनसिटीतून 25 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगी आदींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत कोरोनाची बाधा झालेली आहे व लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या संख्येने कोरोना मुक्त देखील झाले आहेत. ही तरी देखील सर्वत्र काळजीचे वातावरण पसरले आहे अनेक जण काळजी घेत आहेत तरी देखील संख्या वाढत आहे. त्यामुळे आहे – त्यापेक्षा अधिक काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे.