Shevgaon : ढोरजळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
ढोरजळगांव – आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आल्याने एका उसतोड मजुराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव – ने येथे घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
देविदास रामदास माळी (वय-३५वर्षे), असे आत्महत्या केलेल्या उसतोड मजुराचे नाव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनल्याने उपासमारीची वेळ आल्याने काल बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व व्यक्ती घराबाहेर गेल्याची संधी साधुन राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या लोकांनी धावपळ करून त्यास वाचवण्यासाठी गावातील खाजगी दवाखान्यात दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास शेवगाव पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचे रस्त्याने निधन झाले.
पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्याच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात सोशल डिस्टंसिग पाळत ढोराकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवगांव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू केदार हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here