Shevgaon : शहरात कोरोनाचा शिरकाव, मारवाडी गल्ली परिसर प्रशासनाकडून सील

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरात एक 75 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आल्याने शहरातील मारवाडगल्लीचा परिसर दि. 25 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
शेवगाव शहरातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे खाजगी प्रयोग शाळेतील अहवालावरून स्पष्ट झाले. ही महिला अहमदनगर येथे आपल्या मुलीकडे राहत होती. दोन दिवसापूर्वी शेवगावला आली होती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ज्या परिसरात कोरोनाबाधित व्यक्ती राहत होती. तो परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी शेवगाव शहरातील मारवाडगल्लीचा परिसर सील केला आहे. यामध्ये पूर्वेला श्रीनिवास लढ्ढा यांचे घर, पश्चिमेला चंदन अय्यड घर, दक्षिणेला श्रीनिवास तिवारी यांचे घर तर उत्तरेला डॉ. कांदे यांचा दाताचा दवाखाना पर्यंतचा परिसर सील केला आहे.
या परिसरात दि. 25 जुलैपर्यंत परिसरात कोरोना प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनाचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here