Ahmednagar: जिल्ह्यात दिवसभरात 82 रुग्ण; श्रीरामपूरची वाटचाल संगमनेरच्या दिशेने…

2

राष्ट्र सह्याद्री ।
अहमदनगर:

नगर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवासेमधील 6, अकोले येथील 2, संगमनेरमधील तीन आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान संगमनेरमधील पाच जणांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे.

श्रीरामपूर शहरात संगमनेर खालोखाल रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन महसूल व आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे. आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, अन्यथा घरीच राहून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी केले आहे. रुग्ण संख्या वाढल्यामुळे श्रीरामपूर शहरात पुन्हा लॉक डाऊनची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here