कोव्हिड-१९ च्या महामारीत कायदेविषयक थोडेसे…..

अॅड शिवानी झाडे ( एल.एल.बी,एल.एल.एम)
कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे.एकीकडे या संकटामुळे लोकांना खूप तोटे झाले आहे तर एकीकडे फायदे झाले आहेत. या महामारीमध्ये वेगवेगळे कायदे व नियमांचे पालन करणे ही सर्व लोकांची जबाबदारी आहे.म्हणूनच या संकटामध्ये लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिज?कोणते कायदे व नियम पाळले पाहिजे?हे सर्व ज्ञात असणे गरजेचे आहे.म्हणूनच कायदे विषयक थोडेसे….
कोरोना विषाणूने जगभरात लाखो लोकांचे जीव घेतले आहे.ही जागतिक महामारी  [pandemic] आहे.या आधी स्वाइन फ्लू प्लेग, सार्स,काॕलरा या महामारी घोषित केली होत्या. १८९७ साली प्लेग ही महामारी आली होती. या दोन्ही मध्ये खूप लोकांचे जीव गेले होते. त्यासाठी ‘साथ रोग्यप्रतिबंध कायदा,१८९७’ लागू करण्यात आला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कायद्यातील कलम २ देशभर लागू झालं आहे. या कायद्यातील कलम २नुसार राज्य सरकारला साथीचा रोग पसरत असेल किंवा पसरण्याची शक्यता असेल तर त्यावेळी सार्वजनिक सूचना देण्याचे व बंधने घालण्याचे अधिकार आहे.

या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कलम 3 नुसार कारवाई होते. एकंदरीत साथरोग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड विधान संहितेतील कलम १८८नुसार दंडात्मक किंवा ६महिने इतकी शिक्षा होऊ शकते.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरवातीला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १४४ देशात ठिकठिकाणी लागू करण्यात आले.त्यानुसार ५किंवा५पेक्षा जास्त लोक एकत्रित सार्वजनिक ठिकाणी आल्यास १वर्ष कारावसापर्यंतची शिक्षा होऊ शकते.कलम १४४ पेक्षा कडक नियम संचारबंदीत असतात.यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या जातात व कायद्याने यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिलेले आहे.तसेच यापेक्षा कडक नियम हे कर्फ्यू मध्ये असतात.कर्फ्यू मध्ये कधी कधी अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात येतात.थोडक्यात कलम १४४ हे संचारबंदी आणि कर्फ्यू एकमेकांशी निगडित आहे व ते फक्त शासनाच्या निर्बंधावर अवलंबून असते.

प्रत्येक नागरिकाला सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दंड संहितेतील काही तरतुदींची माहिती असणे महत्वाच्या आहे.

कलम १८८ नुसार सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यास६महिने कारावास किंवा शिक्षेची तरतूद आहे.

कलम२७० नुसार कोरोनाग्रस्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गेल्यास २वर्षेपर्यंत कारावास किंवा दंडात्मक कारवाई हाऊ शकते.

*तसेच कलम२७१ अन्वये कोरणटाईन केलेला व्यक्ती जर पळून गेला तर २वर्षापर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो
*कलम २६९नुसार सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे सूचनांचे पालन न केल्यास ६महिने शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. असे वेगवेगळे कायदे व नियम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाळण्याचे आदेश केंद्र सरकार करत आहे.तसेच केंद्र सरकारने काही वस्तू या ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यात’ समावेश केला आहे.उदा.सॅनिटायझर, मास्क,इ.या वस्तू ग्राहकांना योग्य दरात मिळाल्या पाहिजे.सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग (कोव्हिड 19) हा आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून मान्य केला आहे.या कायद्यानुसार समस्या निर्माण होण्याआधी उपाययोजना आखल्या जातात.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे काही गोष्टी शाप तर काही वरदान ठरल्या आहे.यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे,माणुसकी कमी होत चालली आहे ,सामाजिक ,राजकीय,उद्योगधंदे,अर्थव्यवस्था यावर वाईट परिणाम होताना दिसतो आहे. हे सर्व शाप ठरला आहे.एकीकडे जे कर्ता पुरुष आपल्या घरच्या व्यक्तींना वेळ देऊ शकत नव्हते ते आता त्यांना वेळ देऊ लागले आहे,स्वछतेचे महत्त्व सर्वाना समजले आहे. अशाप्रकारे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर याप्रकारचे सर्व कायदे नियमांचे पालन आपण सर्वांनी करणे योग्य ठरेल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here