Newasa : शनिशिंगणापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव, सोनईमध्ये आणखी पाच रुग्ण 

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – सोनई गावात मागच्या आठवड्यात अकरा रुग्ण कोरोना बाधित निघाले असून एकशे पाच रुग्णाचा अहवाल प्रतीक्षेत होता. पण परवा त्यातील ८२ रुग्णाचा अहवाल अबाधित आला होता. त्यामुळे सोनई करांना हायसे वाटले. पण काल रात्री उशिरा पुन्हा पाच रुग्ण कोरोना बाधित निघाल्याने गावात पुन्हा कोरोनाची दहशत वाढली आहे. सोनई बरोबरच शनी शिंगणापूर येथे देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काल जे अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये सोनई चार व शिंगणापूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी तेरा रुग्णांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत असून ते संध्याकाळपर्यंत येतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुर्यवंशी यांनी दिली. तर विलगीकरण कक्षातून ज्या रुग्णांचे स्वाब तपासणी करता पाठवले होते. रुग्ण गावात फिरताना
आढळल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा गावासाठी धोकेदायक ठरु शकतो. विलगीकरण कक्षातून हे रुग्ण बाहेर आलेच कसे हा प्रश्न गावकऱ्यांना पडला असुन गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रात्री कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना तातडीने नेवासा येथील कोवीड सेंटर मध्ये दाखल केले असून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा रात्री उशिरा सोनई येथे भेट
देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तर आणखी रुग्ण वाढल्याने सोनई पोलिसांनी बंदोबस्त आणखी कडक केला असून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती स.पो.नि जनार्दन सोनवणे यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here