Shrigonda : अवघ्या तीन महिन्यात रस्ता खचला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यात श्रीगोंदा ते टाकळी कडेवळीत या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे ९ किमी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, अवघ्या तीन महिन्यात रस्ता अनेक ठिकाणी खचला असल्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जा अतिशय निकृष्ट असल्याची चर्चा होताना दिसत आहे. 

श्रीगोंदा शहरातून कोथींबीरे वाडीतून भिंगान मार्गे टाकळी कडेवाळीत या ठिकाणी जाण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून सुमारे ५८५. ११लक्ष रुपये खर्चून रस्ता बनविण्यात आला या रस्त्याचे काम अहमदनगर येथील एस एस कन्स्ट्रक्शन नावाच्या ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन झाल्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
रस्ता अनेक ठिकाणी खचला असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. तर अनेक जण जखमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बिल अदा करू नये, अशी मागणी भिगान येथील नागरिकांनी केली आहे.
जड वाहने जाऊ नयेत म्हणून खांब लावायला सांगितले होते – 
श्रीगोंदा टाकळी कडे या रोडवरून जड वाहने जाऊ नयेत यासाठी या रस्त्यावर अनेक ठिकाणी लोखंडी खांब बसवायला सांगितले होते. तसे प्लॅनमधेही आहे आणि रस्ता खचला असेल तर आपण ठेकेदाराकडून परत करून घेऊ तरच बिल देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया इंजिनियर खंडागळे यांनी दिली आहे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here