Shrirampur : धनवाट ‘रस्त्याचा’ बट्ट्याबोळ; जडवाहतुकीमुळेच रस्त्याला खड्डे; ‘यास’ कारणीभूत कोण? 

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पावसाळ्यात या खड्डयांमध्ये पाणी साचल्यावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्त्याला चिखल पाणी झाल्याने साचल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहे. खड्डे आणि खड्डेमय रस्ते असे ‘गाव अंतर्गत’ रस्त्याची अवस्था चित्र पहावयास मिळत आहे त्यामूळे हे कायमचे समीकरण झाले आहे.
गेल्या पंचवीस ते तीस वर्षात धनवाट परिसरातील रस्त्याच्या गावकर्‍यांना प्रंचड हाल सोसावे लागत असतानाच त्या अडीच वर्षातच जि प सदस्या सौ आशाताई दिघे स्थानिक निधीतून व अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांच्या प्रयत्नातून निवडणुकीपुर्वीच देऊ केलेले आश्वासन धनवाटकारांना रस्त्याच्या रूपाने मिळाले होते ते आश्वासन त्यांनीही सार्थ ठरवत पुर्णही केले त्यातच युवकांनी सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून त्यांना साथ दिली अडीच वर्षातच काळात डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीतपणे सुरू झाला होता पण आजच्या घडीला या रस्त्याला खड्डेच खड्डे पडून पूर्णपणे खचला गेला आहे.
गावापासूनच रस्ता काहीच धाडाचा राहिला नाहीच, असे चित्र पहायला मिळत आहे. ‘तर’ पहिल्या सारखे दिवस येऊन चालणेही मुश्किल झाले परिसरातच काही दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू असताना त्यामुळे रस्त्याची आणखी वाट लागली आहे ‘अशाप्रकारच्या’ जडवाहतुकीमुळे खड्डेच – खड्डे पडले आहे. त्यामुळे गाड्याही फसत आहे. वरतील भागाचा स्तर उखडला गेला असल्यामुळे रस्ता खचला आहे. यामुळेच या जडवाहतुकीला कारणीभूत कोण? असा उपस्थित सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वीच ‘लम्हाणबाबा’ रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यातच रस्ता सुरळीतपणे वाहतुकीसाठी खुला झाला होता. या अंतर्गत रस्त्यावरुन ‘काहीच’ बहाद्दारांनी तर त्या रस्त्यावरून मुरूमाचे ‘होलवा’ नेले. या पद्धतीने येथिल रस्ता खचून-चिरा पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यास दोषी कोण? हा खरा उपस्थित सवाल काही सामजिक कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here