Sangamner Breaking : लोणी रस्त्यावरील कोचीं शिवारात भीषण अपघात; एक जागीच ठार, तिघे गंभीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

संगमनेर – लोणी रस्त्यावरील कोचीं शिवारातील राज्य महामार्गावर गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आयशर व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी आश्वी पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून वाहनाच्या लाबंच लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कोचीं शिवारात असलेल्या राज्य महामार्गावर गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आयशर (एम. एच. १५. एफ. व्ही. ५५९५) व कटेनर (आर. जे. १४. जी. डी. ३७६८) चा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की, आयशर चालक खंडू रामा वीर (वय – ३५, रा. गाडेकरवाडी, ता. ओझर, जि. नाशिक) हा जागीच ठार झाला असून या अपघात प्रेमचंद काशीराम राजपूत (वय – ३४), दिपक राजपूत (वय – २५) दोघेही रा. राजस्थान राज्य तर मंगेश घनश्याम येवले (रा. पिपळगाव बसवंत, ता. निफाड,) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती आश्वी पोलीसाना कोंची येथिल जयंवत गिते यांनी फोनवरुन देताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार मच्छिंद्र शिरसाठ, विनोद गंभिरे, रवीद्र भाग्यवान, संतोष शिदें, प्रदिप साठे, प्रविण रणधीर, प्रसाद सोनवणे, अनिल शेगाळे हे तात्काळ दाखल झाले व स्थानिकाच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमनेर येथिल रुग्णालयात पाठवण्यात आले.
यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतू थोड्या कालावधीनतंर पोलीसानी वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान जखमीवर संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here