Akole : बीडीओला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अकोले – तालुक्यातील म्हाळुंगे येथील स्त्याच्या केलेल्या कामाचे ३ लाख रुपये बिलाचा चेक काढण्यासाठी ठेकेदाराकडून चार हजार रुपये लाच घेताना अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने  पकडले आहे. यावेळी या अधिका-यांनी छापा पडल्याचे लक्षात येताच नोटा खाऊन घेतल्याचे समजते.

अकोले तालुक्यातील प्रशासनाला हादरून ठेवणारी घटना आज गुरूवारी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास घडली. नाशिक येथील लाच लुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील याच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचायत समिती अकोले कार्यालयात छापा टाकून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे  ठेकेदार असून त्यांनी तालुक्यातील म्हाळुंगे गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या कामाचे बील रक्कम तीन लाख रूपयांचा चेक काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी चार हजार रूपये लाचेची मागणी केली व ती रक्कम रुपये ४००० घेत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. व त्यांना ताब्यात घेत अकोले ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन, इतर झडती घेऊन राञी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अधिका-यांनी खाल्ल्या नोटा
लाचलुचपत विभागाचा छापा पडला असल्याची जाणीव होताच  सदर अधिका-याने नोटा खाऊन घेतल्याने ॲन्टि करप्शनच्या पथकाने त्यांची सोनोग्राफीही केली असल्याचे माहिती समजलेली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here