Sangamner : कोरोना बाधित रुग्ण संख्या त्रिशतकी…

1

राज्यात तालुका पातळी वरील ही सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण संख्या असण्याची शक्यता …..

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरमध्ये कोविडच्या विषाणूंनी अक्षर: थैमान घातले आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत अधिक भर पडत असून संगमनेर तालुक्याची संक्रमित रुग्णांची संख्या त्रिशतकी पार करून 305 च्या वर जाऊन पोहोचली आहे. नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त तर राज्यात तालुका पातळीवरील ही सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण संख्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संगमनेरकरांची धडकन वाढत चालली आहे.

संगमनेर शहरालगच्या अनेक गावे, वाड्या, वस्त्यांवर आता कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने संगमनेर रुग्णसंख्येचा आकडा सतत हालता राहत आहे. नगरच्या तसेच खाजगी प्रयोगशाळेचा असे एकत्रित आकडेवारी येत आहे.
आज सायंकाळ पर्यंत एकूण 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आज दुपारी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर सायंकाळी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आजची सायंकाळपर्यंतची संक्रमित रुग्ण संख्या ही 20 झाली असून यासंख्येमुळे संक्रमित रुग्ण संख्या ही तिनशेच्या पुढे गेली असून एकूण 305 संक्रमित रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे आता प्रशासनही काळजीत पडले आहे.

आज खासगी रुग्णालया मार्फत पाठवण्यात आलेला लखमीपूरा भागातील 50 वर्षीय इसमाचा खासगी अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच शासकीय प्रयोगशाळेतकडूनही संगमनेर शहरातील एका इसमासह तालुक्यातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यात शहरातील देवी गल्ली परिसरात राहणाऱ्या 60 वर्षीय इसमाचा समावेश आहे. त्यासोबतच शहरालगतच्या ढोलेवाडीमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे दिसत असून तेथील 25 वर्षीय व 16 वर्षीय तरुणांसह 14 व बारा वर्षीय मुली तसेच 65 व 21 वर्षीय महिलांना संक्रमण झाले आहे.

तालुक्यातील निमोण येथूनही 65 व 45 वर्षीय इसमांसह 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आत्ता प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात घुलेवाडीतील 57 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. तर सायंकाळी आठ जणांचे अहवाल पॉजीटिव्ह आले आहेत. त्यात मालदाड रोडवरील 50 वर्षीय व्यक्ती व 46 वर्षीय महिला, रहेमत नगर 24 वर्षीय युवक व 44 वर्षीय महिला, मेनरोड वरील 40 वर्षीय व्यक्ती, घोडेकर मळा 49 वर्षीय व्यक्ती, तर घुलेवाडी येथील 53 वर्षीय महिला व 59 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

काल एकूण संक्रमित रुग्ण संख्या 51 झाली..
काल तीन वेळा संक्रमित रुग्ण संख्येचा अहवाल आला प्रथम सकाळी सात, सायंकाळी 23 तर रात्री उशिरा 21 असे एका दिवसात एकूण 51 जणांचे अहवाल प्राप्त झाले हा ही एक जिल्ह्यातील विक्रम ठरला आहे तर आज दुपारी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर सायंकाळी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एकदम त्रिशतक पार करून 305 वर जाऊन पोहचली ही संख्या नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ठरली आहे.यात मात्र तीन रुग्ण हे बाहेरून आले आहेत.त्यात शहरातील शिवाजी नगर येथील एक व नान्नज दुमाला येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here