Shirurkasar : देवालये कडकडीत बंद मद्यालये मात्र जोमात सुरू

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
भाविकांची भक्ती, किमान देऊळात जाऊन दर्शन घेऊ द्या : मागणी

शिरूरकासार – देशासह राज्यात कोरोनाच्या महामारीच्या महासंकटात सापडू नये त्यामुळे कडक अमलबजावणी करण्यात आली असली तरी सामाजिक अंतराचा पूर्ण: फज्जा उडाला आहे. सरकार मद्यालयाला परवानगी देत आहे. मग देवालयाला का? नाही म्हणून आम्ही सर्व नियम पाळू आम्हाला दर्शनाला परवानगी द्या, अशी मागणी वारकरी संप्रदायांकडून होत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना या महासंकटापासून देशवासियांना वाचवण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन लावला. त्याला जनतेनेही प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु उन्हाळ्यात हे सर्वकाही जमले मात्र पावसाळा लागल्यानंतर देशाचे हित पाहता महसूल मिळावा म्हणून दारूची दुकाने उघडली. तेही नियम पाळून, असे आदेश दिले असले तरी या नियमाला सर्वत्र हरताळ लागला असून कुठेच कार्यवाही होताना दिसत नाही. या बाबतीत खेद वाटतो शासनाला हातभार लागत असला तरी देवस्थानातील दर्शनाने कुठलेच नुकसान होत नाही हेही तितकेच खरे.
राहिला प्रश्न सामाजिक अंतराचा तोही नियम भाविक भक्त पाळायला तयार आहेत परंतु सरकारने जशी मद्यालये सुरू केली तशी तमाम भाविक भक्तांची देवालये सुरु करावीत, अशी मागणी भाविकांकडून होताना दिसत असून ही मागणी
आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here