Crime: लाखो रुपयांची दुध पावडर लुटणारे चोरटे जेरबंद

4

सोनई पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी

किरण चंदेल । राष्ट्र सह्याद्री
सोनई: नगर औरंगाबाद रस्त्यावर शिंगवे तुकाई शिवारात औद्योगिक वसाहतीतील दुध पावडरचे गोडाऊनचे शटर तोडून लाखो रुपयांच्या दुध पावडरच्या गोण्या चोरुणार्या चोरट्यांना सोनई
पोलिसांनी जेरबंद केले.

सोनई पोलीस ठाण्यात दि १३/७/२०२०रोजी गोडाऊनचे शटर तोडून मिल्कमीस्ट कंपनी गोवर्धन कंपनीच्या ६५००००किंमतीच्या३५०ते४००गोण्या चोरीस गेल्याची तक्रार शेख अब्दुल अजीज जैनुद्दीन रा मुकुंद नगर नगर यांनी दिली होती. त्या अनुशंगाने तपास करताना गुप्त माहिती मिळाल्याने सोनई पोलिसांनी दोन स्वतंत्र पथक तयार करुन शिंगवे तुकाई शिवारात आरोपी ज्ञानेश्वर मच्छिंद्र पुंड वय२६
रा शिंगवे तुकाई व अविनाश एकनाथ विरदकर वय२८रा शिंगवे तुकाई ता नेवासा या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या कडे कौशल्याने विचारपूस करताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


चोरीसाठी वापरलेला महींद्रा कंपनीचा मालवाहू टेम्पो क्र एम एच१७/४८६४ दुध पावडर सह १०,९३,८१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना दि २०पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उप विभागीय अधिक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिस स्टेशनचे स.पो.नी जनार्दन सोनवणे, स.पो.नी.ज्ञानेश्वर थोरात, माने, शिंत्रे, बाबा वाघमोडे, गावडे यांनी ही कामगिरी केली.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here