Sangamner : शहरात कोरोनाचे चक्र जोरात; दोन दिवसात 91 रुग्ण

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेररात काल (गुरुवार) दुपारी 8, संध्याकाळी 12 व पुन्हा रात्री 20, असे एकाच दिवशी एकूण ४० रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण रुग्ण संख्या 322 वर पोहोचली आहे.

गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील बागवानपुरा येथे 27, 50, 45 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सय्यद बाबा चौक येथे 49 व 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित झाले आहेत. तर तालुक्यातील कुरण येथे 27 व 19 वर्षीय तरुणी, राजापूर येथे 38 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे 16 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 58 वर्षीय महिला, सुकेवाडी येथे 61 वर्षीय पुरुष आणि निमोण येथे 36, 40, 11, 11 वर्षीय पुरुष, 61, 75, 09 वर्षीय महिला, असा एकूण 20 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे कालची एकूण संख्या 40 झाली आहे. बुधवारी दिवस भरात 51 तर काल गुरुवार दिवसभरात 40 रुग्ण वाढल्याने दोन दिवसात संगमनेर तालुक्यात 91 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. आज सकाळपर्यंत 322 वर रुग्ण संख्या पोहोचली आहे. त्यामुळे संगमनेरकरांची धडधड वाढली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here