Big breaking : भगतसिंह, राजगुरुंसह कुरबान हुसेन फासावर! बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील घोडचूक

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  बालभारती हे शालेय मुलांचे आवडीचे पुस्तक मुलांना चांगले धडे देण्याचे काम या पुस्तकातून होते. याच बालभारती पुस्तकात घोडचूक झाली असून ती देखील यदुनाथ थत्ते यांच्या भारत माझा देश आहे या धड्यात. या धड्यात मुलांना शिकवले जात आहे. भगतसिंह, राजगुरंसह कुरबान हुसेन फासावर गेले. या परिच्छेदात म्हटलय…

  “देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
  “बरोबर आहे” मुले म्हणाली.
  एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
  मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…

  दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. “आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील चूक ही ‘गाढव चूक’ असून निंदनीय आहे. हे पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा” असे दवे म्हणाले.

  “याची शहानिशा करुन चौकशी व्हावी. ही छपाईची चूक असू शकते, जाणूनबुजून कोणी केले असेल असे वाटत नाही” असे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. “महाविकास आघाडी सरकार संवेदनशील असून प्रत्येक महामानवाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करते. त्यामुळे याला राजकीय रंग असेल असे वाटत नाही, चौकशी करुन कारवाई करावी” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here