Rahuri : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ: राज्यप्रमुख संघटकपदी रामपूरचे अनिल लोखंडे   

0

राज्यकारिणी निवड जाहीर                                                           

प्रतिनिधी | भारत थोरात | राष्ट्र सह्याद्री 
राहुरी तालुक्यातील रामपूर येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील बालवयापासून सामाजिक कार्यात सहभाग घेऊन शैक्षणिक सामाजिक व निसर्गाचा अभ्यास करून धडे देणारे आज त्यांच्या कामाची पावती म्हणुन त्यांनी आपले पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण संवर्धन या कार्याची राज्यपातळीवर दखल घ्यावी लागली. राज्य पातळीवर कार्यरत असणारी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या बैठकीत प्रमुख संघटकपदी प्रा. अनिल किसन लोखंडे – राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त यांची सन २०२०/२५ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली.
अशा या ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील अनिल लोखंडे सर यांनी आतापर्यंत भूतान देशाचा पर्यावरण दौरा , चिपळूण व राळेगणसिद्धी येथील राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात सहभाग घेऊन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत सिंगापूर देशाचा शैक्षणिक अध्यापन पद्धतींचा अभ्यास दौरा, निरनिराळ्या राज्यस्तरीय प्रशिक्षणात सहभागी होऊन पुढे तज्ज्ञमार्गदर्शकाचे कार्य केलेले आहे.

आपले बुद्धीकौशल्य वापरुन राष्ट्रहित व समाजहित जोपासत पर्यावरण पूरककार्य त्यांनी करावे यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र व वनश्री पुरस्कार प्राप्त आबासाहेब मोरे सर, उपाध्यक्ष विलास महाडिक सर, कार्याध्यक्ष माजी प्रा.जी.डी. शिंदे सर,सचिव प्रमोद मोरे सर यांचे प्रमुख उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यांचे निवडीबद्दल लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पा प्रवरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष – मा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील , दक्षिण लोकसभा खासदार डॉ. सुजय दादा विखे पा , संस्था संचालक आहेर सर , इतर संस्था पदाधिकारी , प्रदीप वाल्हेकर सर , जे जी मुसमाडे, जी बी खर्डे , आजी व माजी मुख्याध्यापक , रावसाहेब साबळे पाटील – अध्यक्ष संत महिपती महाराज ट्रस्ट , मा सरपंच राहुल पा साबळे ,सरपंच सौ मनीषा भोसले ,भाऊसाहेब साबळे ,ज्ञानदेव पा लोखंडे , राजेंद्र खळदकर, प्रकाश साबळे ,ज्ञानदेव सरोदे , ज्ञानदेव मोरे ,सोपान नालकर व इतर मित्र परिवार यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here