Kopargaon : गोकुळनगरीत चोरी,संवत्सर येथील आरोपी जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव शहरातील गोकुळनगरीत भाड्याच्या बंगल्यात रहिवाशी असलेल्या मात्र संवत्सर शेती महामंडळाची शेती भाडेकराराने घेतलेले इसम लोकेश आप्पासाहेब बाश्यम (वय-२७) मूळ रा.आंध्रप्रदेश चंद्रमौजी नगर यांच्या बंगल्यातून त्यांच्याच शेतात काम करणारा आरोपी मजूर समीर उस्मान शेख रा.लक्ष्मणवाडी संवत्सर ता.कोपरगाव याने १५ हजार रुपये किमतीचे हायर कंपनीचा एक वातानुकूलन यंत्र,८ हजार रुपये किमतीचा एक एल.ई.डी. दूरदर्शन संच,१ हजार रुपये किमतीचा एक के.एस.बी.कंपनीची पाऊण इंची पाण्याची इलेक्ट्रिक मोटार असा २४ हजार रुपयांचा ऐवजाची चोरी केली असल्याची घटना उउघडकीस आली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी हा ऐवज जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत शेती महामंडळाची शेती असून या शेतीतील काही हिस्सा हा आंध्रप्रदेशातील इसम लोकेश बाश्यम यांनी अकरा वर्षाच्या कराराने कसण्यासाठी घेतलेली आहे. त्या ठिकाणी ते पंचवीस ते तीस मजुरांच्या सहाय्याने आपली शेती कसतात. त्यात मागील पाच महिन्यापासून समीर शेख हा देखील मजुरीने काम करतो. तो या मालकाच्या गोकुळनागरी येथील बंगल्याच्या सफसफाईसाठी आला होता. व त्याच्याकडून बंगल्याची साफसफाई करून घेतली होती. व ते दि.१४ जुलै रोजी शेताच्या कामासाठी संवत्सर येथे शेतावर गेले असता व तेथेच थांबले असता १६ जुलै रोजी त्यांना कोपरगाव शहर पोलिसांच्या भ्रमणध्वनिवरून फोन आला व त्यांनी तुमच्याकडे कामास असलेला कामगार समीर उस्मान शेख हा घरफोडीचे संशयावरून ताब्यात घेतला असता त्याने तुमचे गोकुळनागरी येथील बंगल्यातून १५ हजार रुपये किमतीचे हायर कंपनीचा एक वातानुकूलन यंत्र,८ हजार रुपये किमतीचा एक एल.ई.डी. दूरदर्शन संच,१ हजार रुपये किमतीचा एक के.एस.बी.कंपनीची पाऊण इंची पाण्याची इलेक्ट्रिक मोटार असा २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची माहिती दिली आहे.

त्यामुळे फिर्यादी मालक लोकेश बाश्यम यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२६१/२०२० भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८१ प्रमाणे आरोपी समीर शेख याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे हे करत आहेत.

दरम्यान संवत्सर परिसरात शेती महामंडळाच्या शेतात व रिकाम्या दिसणाऱ्या जागांत बेकायदा रहिवाशांची मोठी संख्या वाढली असून छोट्या-मोठ्या चोऱ्यांत मोठी वाढ झालेली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी कसून चौकशी केल्यास अजून चोऱ्या प्रकाशात येतील असा कयास व्यक्त होत आहे.हा जेरबंद आरोपी हा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here