मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक नेमा

0

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानूदास बेरड यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी

भाजप अहमदनगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांचीच नेमणूक करावी व काही राजकीय पक्षाकडून होणारा घोडे बाजार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

कोरोना महामारीच्या प्रसंगी प्रत्येक गावाने विद्यमान सरपंच यांच्याच नेतृत्वा खाली यशस्वी लढा दिला आहे. त्याच बरोबर अनेक विकास कामे चालू आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही पक्षाकडून घोडेबाजारच्या आधारावर प्रशासक यांच्या नेमणुका झाल्या तर विकास कामांना खिळ बसेल व गावची राजकीय सामाजिक घडी विस्कटेल व गावातील वातावरण कलुषित होईल.

त्यामुळे विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमले पाहिजे, राजकिय अस्थिरता निर्माण झाल्यास पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना काळजीवाहू म्हणून काम पाहण्यास सांगितले जाते. त्याप्रमाणे ग्रामपंचायत बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here