Corona : पाथर्डीचा शिरूरकासारने घेतला धसका; तब्बल 32 रूग्ण सापडल्याने तालुकावासियांचा जीव टांगणीला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | जगन्नाथ परजणे
शिरूरकासार – पाथर्डी तालुक्यात कोरोनाने कहर केला असून एका दिवसात तब्बल 32 रूग्ण सापडल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ तर उडालीच परंतू शेजारी असलेल्या शिरूरकासार तालुक्यातही भीती पसरली आहे. तालुकावासियांचा जीव आता टांगणीला लागला आहे.
शिरूरकासार व पाथर्डी या दोन शेजारी असलेल्या तालुक्यांचे 30 किमी असून शिरूरकासार तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांचा रोजचा संपर्क पाथर्डीशी येतो. अन् पाथर्डी तालुक्यातील अनेक गावे ही शिरूरकासार शहराच्या पाच ते दहा किमी अंतरावर असल्याने त्या गावातील लोकांचा बाजारपेठ मोठी असल्याने रोजचा संपर्क असतो. तालुक्यातील जवळपास 60 टक्के कर्मचारी हे पाथर्डीला राहतात. नगर-बीड जिल्ह्याला जोडणारे हे सिमेलगत असलेले दोन तालुके आहेत. कोरोना अदृश्य महामारीने जीवन जगणे मुश्कील केले आहे. दररोजच्या दररोज रुग्ण वाढताना दिसत असल्याने नागरिकांची चिंता वाढतच चालली असून माणूस असुरक्षित झाला आहे.
शिरूरकासार तालुकावासी जनता जिल्ह्यात रूग्ण 300 च्या वर गेली असल्याने चिंतेत असताना अचानक गुरुवारी
शेजारील असलेल्या पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 32 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निघल्याने पाथर्डी सह शिरूरकासार तालुक्यातील जनतेलाही विजेचा शॉक बसल्यागत जबरदस्त धक्का बसला असल्याने धाकधूक वाढली असून तालुक्यात एकच कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला रूग्ण तो आता निगेटिव्ह झाला असला तरी शेजारील पाथर्डी तालुक्याची शिरूरकासार तालुक्याला धाकधुकच वाढल्याने भितीदायक वातावरणात निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here