स्थानिक गुन्हे शाखेची मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
पिरसावंगी (ता. बदनापूर) येथील कृष्णा सुभाष कातुरे (वय २६) याच्या घरावर कालरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिन्ह गौर यांच्यासह पथकाने छापा टाकला. कारवाईत साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
यावेळी घर झडतीमध्ये ५ लाख २५ हजाराच्या राजनिवास गुटख्याच्या ७५ गोण्या, ४८ हजार ९६० रुपयाच्या राजनिवास जर्दाच्या ४० गोण्या, १ लाख ५८ हजाराच्या विमल गुटख्याच्या ४० गोण्या, १७ हजार ६०० रुप्याच्या विमल जर्दाच्या ४० गोण्या, १ लाख ७६ हजार ४०० रुपयांच्या गोवा पर्पल गुटख्याच्या २२ गोण्या, १३ हजार ७५० रुपयांचे जीवन गुटख्याचे ५५ पुढे, असा मोठा साठा आढळून आला आहे.
यावेळी आरोपी कृष्णा कातुरे यास ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ९ लाख ३९ हजार ७१० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आहे. राजूर येथील कुख्यात गुटखामाफियाने विक्रीसाठी गुटखा पुरविला असल्याची माहिती आरोपीने चौकशीत दिल्याचे समजते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.
browse tinder for free , tinder website https://tinderdatingsiteus.com/