Shrigonda : बेलवंडीकरांना प्रतीक्षा ‘त्या’ दहा अहवालाची; बेलवंडीत प्रथमच कोरोनाचा शिरकाव     

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री       

श्रीगोंदा तालुक्यातील बाजारपेठेने गजबजलेल्या आतापर्यंत कोरोनावर मात करणार्‍या बेलवंडी बुद्रुक या गावात नुकताच पहिला कोरोना रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल दहा व्यक्तींना श्राव घेण्यासाठी श्रीगोंदा येथील कोविड सेंटरला पाठविण्यात आले आहेत. बेलवंडी गावात नुकताच पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्याने शुक्रवारी गावातील काही व्यवसायिकांनी दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला. तसेच अनेक दुकानदारांनी सेवा देणे पसंत केले. परंतु आज गावातील बाजारपेठेत सकाळपासूनच शुकशुकाट जाणवला. अनेक नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले की जे आजच्या वेळेला खूपच आवश्यक आहे.

प्रशासनाच्या वतीने गाव बंद ठेवण्यात आलेले नाही. परंतु पुणे जिल्ह्यातून आपल्या बेलवंडी या मूळ गावी आल्यानंतर ज्या भागात हा पहिला रुग्ण आढळून आला. तो भाग मात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेलवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला व बेलवंडी गावाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सुनीलजी पोटे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहिफळे यांनी भेट दिली, बेलवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री यादव सह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली हिरवे यांच्याशी खास बातचीत केली व संक्रमण थांबवण्यासाठी कशा पद्धतीने उपाय योजना कराव्यात या  संबंधित सूचना दिल्या. गावातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. विशेषत: दोन व्यक्तीतील योग्य अंतर कायम राखावे, असे मत ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यानी मांडले.

आज श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे तीन तर लोणी व्यंकनाथला दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. या नवीन रुग्णासहित श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी तालुका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना हव्यात अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी होत आहे. अनेक समारंभ विना परवानगी साजरे केले जात आहेत. हे टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे मत जानकरांकडून व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here