Shrigonda : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा येथे घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी (दि. १४) शिक्षक कॉलनी श्रीगोंदा येथे बंद घराचे पाठीमागील दरवाजा उचकटून घरातील चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन पो नि दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले यांनी कॉबिंग ऑपरेशन राबवून रमेश अमाद्या चव्हाण, दत्ता रमेश चव्हाण दोघेही रा. जलालपूर ता. कर्जत, गणेश मंगेश काळे रा. कुळधरण ता. कर्जत यांना भा दं वि कलम ४५४, ४५७, ३८०, ३७९, ४६१ प्रमाणे अटक करण्यात आली.

दरम्यान श्रीगोंदा, शिरूर, कर्जत या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून या आरोपीकडून तीन मोटारसायकल, एक होम थिएटर, चांदीचे दोन करंडे, दोन एल.ई.डी. असा सुमारे १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता असल्याने पुढील तपास चालू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सताव यांनी दिली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ योगेश सुपेकर, पोकॉ किरण भापकर, पोकॉ नय्युम पठाण, पोकॉ प्रशांत राठोड मोबिल सेल अहमदनगर यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here