Rahuri : क्वारंटाईन केलेल्या ‘त्या’ महिलेने दिली आत्महत्येची धमकी 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राहुरी तालुक्यातील एका दूध संघातील राजकीय पदाधिकारी कोरोनो बाधित निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. राहुरी कारखाना येथील एकाच कुटुंबातील तिघांना क्वारंटाईन केल्यानंतर या कुटुंबातील 38 वर्षीय महिलेने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील क्वारंटाईन कक्ष अक्षरशःहा डोक्यावर घेतला. राहुरी तहसिलदार, तालुका वैद्यकिय अधिकारी, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, मुख्याधिकारी वाटेल तशा भाषेत बोलून आम्हाला घरी नेऊन सोडा आम्हाला काही होणार नाही. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा स्ञाव तपासणीचा आल्या शिवाय सोडता येते, असे सांगितले असता या महिलेने मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याने प्रशासनाने तिच्यासह कुटुंबाला रुग्णवाहिनीतून घरी सोडण्यास सांगितले. रुग्णवाहिनी दारात पोहोचली या तिघांचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्यावेळी माञ या महिलेने नरमाईने घेत आम्हाला उपचारासाठी परत न्या. रुग्णवाहिनेच्या चालकाने स्पष्ट नकार दिला. वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी त्यांना उपचारासाठी पुन्हा पाठवले. घडलेल्या घटनेस डॉ. मासाळ यांनी दुजोरा दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका दूध संघातील राजकीय नेत्यासह त्यांचे कुटुंब कोरोना बाधित  निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामध्ये राहुरी कारखाना येथील एका  कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश होता. त्या राजकीय पदाधिकाऱ्याचा वाहन चालक असल्याने त्या नेत्याशी या वाहन चालकाचा जादा संपर्क असल्याने त्यास दि.12 जुलै  रोजी कृषी विद्यापीठात क्वारंटाईन करण्यात आले.

दि. 13 जुलैपासून या कुटुंबातील 38 वर्षीय महिलेने राहुरी तहसिलदार एफ.आर.शेख, तालुका वैद्यकिय अधिकारी नलिनी विखे, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या समोर गोंधळ घालत आपत्ती व्यवस्थापन कामात अडथळा आणला. वाटेल तशा भाषेत बोलून आम्हाला घरी नेऊन सोडा आम्हाला काही होणार नाही. आम्ही आमची जबाबदारी घेण्यास समर्थ आहोत. परंतू तहसिलदार सह इतर अधिकाऱ्यांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने त्या महिलेच्या गोंधळाचे चिञिकरण करुन घेतले. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा घशातील स्ञाव तपासणीचा अहवाल येत नाही तो पर्यंत सोडता येत नाही.असे सांगितले असता नाही त्या महिलेने गोंधळ घातला.

दि.14  जुलै रोजी सायंकाळी इतर भागातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी आणले असता या महिलेने गेट बंद करुन घेतले. आम्हाला घरी नेऊन घाला तर गेट उघडले जाईल नाही तर क्वारंटाईन करण्यासाठी आणलेल्या व्यक्तींना आत येऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली. याबाबतची तहसिलदार एफ.आर. शेख यांना देण्यात आली.राञीची वेळ आहे. उद्या सकाळी तुम्हाला घरी सोडण्यात येईल, असे तहसिलदार यांच्या वतीने सांगण्यात आले. परंतू त्यापूर्वी तुम्हाला लेखी लिहून द्यावे लागेल की होणाऱ्या परिणामास व आजाराबाबत होणाऱ्या परिणामास आम्ही जबाबदार राहू, असे त्या कुटुंबाच्या वतीने त्या महिलेने लेखी दिले.

त्यानुसार दि 16 सकाळी 11 वाजता या कुटुंबास 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिनेतून घरी सोडण्यात आले. रुग्णवाहिनी त्या कुटुंबाच्या दारात पोहोचली. त्यावेळी कुटुंबाचा अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात हे कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे नमुद करण्यात आले होते.

रुग्णवाहिनीच्या चालकाच्या भ्रमणभाषवर आरोग्य विभागाने संपर्क साधून ते कुटुंबबाधित असल्याचे सांगितले. त्या कुटुंबाला तसा निरोप देण्यास सांगितले. रुग्णवाहिनी चालकाने तसा निरोप देताच त्या कुटुंबातील महिलेने आम्हाला उपचारासाठी परत घेऊन जा अशी विनवनी केली. परंतू रुग्णवाहिनी चालकाने स्पष्ट शब्दात इन्कार दिला. मला तुम्हाला घरी सोडण्यास सांगितले होते.

तुम्हाला घरी सोडले माझे काम झाले. तुम्ही आता खाजगी रुग्णालयात उपचार घ्या, असे म्हणून रुग्णवाहिनी चालक रुग्णवाहिनी घेऊन निघाला असता त्या कुटुंबाने डॉ. मासाळ यांच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिनी चालकास आम्हाला उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगा, अशी विनंती ते कुटुंब करु लागले. डॉ. मासाळ यांनी रुग्णवाहिनी चालकास भ्रमणभाष वरून संपर्क साधून त्या कुटुंबास उपचारासाठी घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर रुग्णवाहिनी चालकाने त्या कुटुंबाला उपचारासाठी घेऊन गेला.

“त्या महिलेवर कारवाई होणार की नाही?”

क्वारंटाईन असलेल्या महिलेने घरी जाण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या विलगिकरण कक्षात महसुल व आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या समोर गोंधळ घातला. गोंधळ घालताना खालच्या भाषाचा वापर केला.याचे महसुल विभागाने चिञिकरण केले. सक्षम पुरावा असल्याने “त्या महिलेवर कारवाई होणार की नाही?” याबाबत राहुरीचे तहसिलदार  एफ.आर.शेख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here