Nature : शिरूरकासारमध्ये आढळला दूर्मिळ पांढरा कावळा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिरुरकासार – कावळा म्हटलं की काळ्या रंगाच्या पक्षाचे आपल्यासमोर चित्र उभे राहते. मात्र पांढरा ही कावळा असतो हे अनेकांना माहित नाही. शिरूर कासार येथील बालाजीनगरमध्ये पांढरा कावळा दिसून आला असून ही अपवादाने घडणारी घटना आहे.
निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार नेहमीच पाहायला मिळत असतात. खरे तर हे चमत्कार नसून या पाठीमागे वैज्ञानिक कारणही दडलेले असते. मात्र, आपण जे रोज पाहतो त्या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण काही पहायला मिळाल्यास तो चर्चेचा विषय ठरत असतो. अशीच घटना शिरूरकासार शहरातील बालाजीनगर या भागामध्ये घडली आहे. अत्यंत अपवादाने दिसणारा पांढरा कावळा येथील डॉक्टर मधुसूदन खेडकर यांना दिसून आला. त्यांनी ही माहिती तात्काळ सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांना दिली.

पांढऱ्या कावळ्याबद्दल ग्रामीण भागामध्ये अनेक गैरसमज आहेत. पांढरा कावळा दिसल्यानंतर दुष्काळ पडतो, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. परंतु हा गैरसमज असल्याचे निसर्गाने आत्तापर्यंत सिद्ध केले आहे. या अगोदर 9 वर्षापूर्वी शिरूरकासार शहरात असाच पांढरा कावळा आढळून आला होता. त्यावेळी मोठे कुतूहल वाटले होते.

Milanin रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे असे प्राणी जन्मास येतात. किंवा अनुवंशिकतेमुळे. माता पिता जर रंगहिन असतील तर त्यांच्या कडून जन्मास येणाऱ्या पुढची पिढी २५ टक्के Albinism चे Gens पुढच्या पिढीकडे आलेले असतात. पांढरा कावळा जन्मास येण्याचे हे कारण असते. असे बरेच प्राणी जन्मास येतात.

अशी घटना ही लाखात एखादी असते.
*-सिद्धार्थ सोनवणे* (वन्यजीव अभ्यासक)
अध्यक्ष-वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅड सेंच्युरी असोसिएशन

“शिरूरमध्ये आढळलेला पांढरा कावळा हा साधारण दीड महिन्याचा असावा. त्याच्या डावा पाय थोडा कमकुवत असल्याने त्यास उडण्यास थोडा त्रास होत आहे. जर त्याला चांगली भरारी घेता नाही आली तर त्यास पकडून सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी आणले जाईल. सध्या हा कावळा निसर्गात मुक्त असून लवकरच तो बरा होऊन निसर्गात मुक्त संचार करील अशी आशा आहे .”

*सृष्टी सोनवणे*
संचालिका -सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र
तागडगाव, ता.शिरूर कासार ,जी.बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here