Breaking News : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोना, स्वत: गडाख होम क्वारंटाईन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री व उस्मानाबादचे पालकमंत्री सोनईचे रहिवासी शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे होम क्वारंटाईन झाले आहेत. 

सोनई गावात आतापर्यंत एकाच गल्लीत असणारा कोरोनाचा संसर्ग आता गावातील इतर भागात देखील पसरत आहे.
सोनईमध्ये काल रात्री तीन तर आज सकाळी पुन्हा तीन रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. आज आलेले तीनही अहवाल हे गावातील ईतर भागातील आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेले आहेत. मंत्र्याच्याच घरात कोरोनाचा संसर्गाचा शिरकाव झाल्याने गावकरी मात्र धास्तावले असले तरी कुणीही घाबरून जाऊ नये.

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शंकरराव गडाख व प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here