Kopargaon : मढी खुर्द येथे माजी जिल्हा परिषद सदस्यास मारहाण, गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य व मढी खुर्द येथील रहिवाशी सोपानराव निवृत्ती गवळी यांना त्याच गावातील खुनाच्या गुन्ह्यात चौदा वर्ष खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार उत्तम लहानू माळी (वय-४२) याने दारू पिण्यास एक हजार रुपयांची मागणी करत शिवीगाळ दमदाटी करत हातातील लोखंडी गजाने मारहाण करत त्यांना गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडल्याने मढी खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, सोपानराव गवळी हे पोहेगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. ते काल दि.१७ जुलै रोजी आपल्या घरी असताना त्याच गावातील आपल्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात चौदा वर्ष शिक्षा भोगून आलेला आरोपी हा काल शुक्रवार रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी गेला व त्याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी १ हजार रुपयांची मागणी केली असता सोपानराव गवळी यांनी त्यास नकार दिला असता आरोपी उत्तम लहानू माळी याने,”मी माझ्या सख्खा भावाचा खून करून चौदा वर्ष शिक्षा भोगून आलो आहे. मी कोणाला घाबरत नाही” असे म्हणून त्यांना शिवीगाळ दमदाटी करून त्याचे हातातील लोखंडी गजाने पाठीत,डोक्याला,डाव्या कानाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमीचे पुतणे बिपीन ज्ञानदेव गवळी (वय-४२) रा.मढी खुर्द यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१६७/२०२० भा.द.वि.कलम ४५२,३२६,५०४,५०४ प्रमाणे आरोपी उत्तम माळी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.भताने हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here